Jitendra Awhad पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेमुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आपला निर्णय मागे घेण्यासाठी भावनिक आवाहन केले. पवारांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुध्दा आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरु केले आहे.
आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा…!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, याकारणासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा देखील त्यांनी प्रश्न विचारला आहे. यासोबतच आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे ??