Nitin Gadkari, Nagpur News : भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकी देत जीवे मारण्याचे फोन करुन खंडणी मागणारा आरोपी जयेश पुजारी याला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कर्नाटकातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जयेश पुजारीला बेळगाव जेलमध्ये पाठवलं आहे.(Nitin Gadkari)
काल रात्री नागपूर पोलिसांचं विशेष पथक विमानाने पुजारीला बेळगावला सोडायला गेलं होतं. कर्नाटकात पुजारीविरोधात अनेक विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसही तपास करत आहेत. कर्नाटकातील न्यायालयात अनेक प्रकरण जयेश पुजारी आणि त्याच्या सहकारी दहशतवाद्या विरोधात सुरू आहेत. त्यामुळे कर्नाटक मधील प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुजारीला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.(Jayesh Pujari)
नागपूर ऐवजी बेळगावच्या जेलमध्ये ठेवा; जयेशची मागणी
काही दिवसापूर्वी स्वतः जयेशने नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्याने मला नागपूरच्या जेल ऐवजी बेळगावच्या जेलमध्ये ठेवण्यात यावं असं त्याने याचिकेद्वारे मागणी केली होती.
लोखंडी जाळीची तार खाल्ल्याचा केला होता कांगावा
गँगस्टर जयेश पुजारीने यापूर्वी देखील नागपूरच्या अंडासेलजेलमध्ये अनेक नावेगवेगळे प्रकार केले होते. नागपूर कारागृहातील बराकमध्ये असताना तिथल्या लोखंडी गजांना लावलेल्या जाळीच्या तारीचे बारीक तुकडे गिळून मी लोखंडी तार खाल्ल्याचा फतवा केला होता. मात्र त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेऊन तपासला असता ही तार नसून बारीक तुकडे असल्याचे निष्पन्न झाले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीनं दोनदा फोन करून खंडणीची मागणी केली होती. यावेळी तो बेळगावच्या तुरुंगात कैद होता. दरम्यान त्यानं पहिल्यांदा 100 कोटी आणि नंतर 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर गडकरींना जीवे मारण्याची धमकी पुजारीनं दिली होती. जयेश पुजारीने बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी खंडणी मागणीच साठी फोन ककेला होता