उरुळी कांचन, (पुणे) : श्रीप्रयागधाम (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री देविदास चांदणे यांची शुक्रवारी (ता.1) बिनविरोध करण्यात आली. उपसरपंच निलम व्होरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच महात्माजी ब्रीजमोहन धवन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
जयश्री चांदणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी महात्माजी ब्रीजमोहन धवन यांनी जयश्री चांदणे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामसेविका स्मिता विरकर यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.
यावेळी श्रीप्रयागधाम हॉस्पिटलचे मुख्य विश्वस्त महात्माजी आत्मप्रेमानंद, ग्रामसेविका स्मिता विरकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद प्रेमकुमार, निलम व्होरा, नताशा भल्ला, बापू हाके, रंजना दीक्षित, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दाभाडे, मा. सदस्य देविदास चांदणे, समाधान अवचट, राजु खरात, दिपाली खेडेकर, कांतीलाल शेलार आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच जयश्री चांदणे निवडीनंतर म्हणाल्या, “भविष्यकाळात विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे.”