Jalgaon News : जळगाव : बहुतांश शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा देखील पुन्हा सुरू झाल्या. पण भुसावळ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. प्रार्थना म्हणत असताना 13 वर्षांच्या मुलाला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यामध्येच या लहानग्याचा मृत्यू झाला. (Unfortunate! The first day of school was the last day of life)
भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. सुयोग भूषण बडगुजर या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सुयोग हा या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता.
जळगाव जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. (Jalgaon News) आठवीच्या वर्गाचा पहिला दिवस असल्याने सुयोग हा सकाळी शाळेत गेला. शाळेची प्रार्थना सुरू असताना सुयोगला अचानक चक्कर आली आणि यामध्येच तो जमिनीवर कोसळला. या प्रकारानंतर सगळेच घाबरले. पण त्यावेळी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन’ने होता ग्रस्त
सुयोग हा ‘ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन’ या आजाराने ग्रस्त होता.(Jalgaon News) दोन ते तीन महिन्यांपूर्वी याचे निदान झाले होते. याबाबत त्याला दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांना दाखवले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.