Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची NDAसोबत जवळीक? खासदारांची पतंप्रधान मोदींशी 15 मिनिटांची गुप्त भेट; नेमकं काय ठरलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 August 2026, 13:14

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) 8 खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, पक्षाकडून या सर्व चर्चा फेटाळून लावत ही भेट केवळ महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांकडून महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली.

तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, पीक विमा योजनेत आवश्यक बदल करावेत आणि कांद्याच्या दराचा प्रश्न त्वरित सोडवावा. तसेच उजनी धरणातून मांजरा नदीत पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुणे-नाशिक मेट्रो, कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करावीत. यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने त्वरित पाठवावा, अशी मागणी मांडली गेली.

 

गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ‘पीएम केअर्स फंड’मधून खासदारांना मिळणाऱ्या निधीत वाढ करावी, कॅन्सरच्या उपचारासाठी मोठी तरतूद करावी आणि पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

संसदेचे कामकाज स्थगित असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडवण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. “आम्ही विरोधी पक्षातच आहोत आणि तिथेच राहू. मतदारसंघातील विकासकामांसाठी पंतप्रधानांची भेट घेणे म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत जाणे असा होत नाही,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post

अचानक ब्रेक दाबला अन् मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याला भीषण अपघात; एर्टिगाचा चेंदामेंदा, एक कार्यकर्ता गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp