Indapur APMC News इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून शनिवारी (ता. २०) बाजार समितीच्या सभापतीपदी विलास सर्जेराव माने तर उपसभापतीपदी रोहित वसंतराव मोहोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. (Vilas Mane as Chairman of Indapur Agricultural Produce Market Committee; Burst of firecrackers and jubilation)
उपसभापतीपदी रोहित मोहोळकर बिनविरोध
माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने तर उपसभापतीपदी रोहित मोहोळकर यांसारखे अनुभवी चेहरे मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (Indapur APMC News)
इंदापूरच्या राजकारणात विलास माने यांचे मोठे योगदान आहे. (Indapur APMC News) यापूर्वी त्यांनी इंदापूर बाजार समितीचे सभापती, उपसभापतीपदासह संचालक पद देखील भुषवले आहे. बाजार समितीच्या कामकाजाचा तगडा अनुभव व सर्वांना जेष्ट व्यक्तीमत्व असल्याने पुन्हा एकदा बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. रोहित मोहोळकर एक युवक, अभ्यासू आणि अनुभवी चेहरा व सरपंचपद भुषवत असल्याने उपसभापतीपदी त्यांची वर्णी लागली आहे.
विलास माने यांनी आत्तापर्यंत बाजार समिती वगळता विभागीय संचालक पुणे (इफको नवी दिल्ली), विद्यमान संचालक इंदापूर अर्बन बँक, संस्थापक अध्यक्ष राजेंद्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (बंबाडवाडी कुरवली), संस्थापक अध्यक्ष दुग्ध व्यवसायिक संस्था कुरवली आदी महत्वाची पदे भुषवली आहेत. (Indapur APMC News)
यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने बाजार, समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती दत्तात्रय फडतरे, संचालक मधुकर भरणे, दीपक जाधव, निरा भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, (Indapur APMC News) कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, राहुल जाधव, गणेश झगडे, संतोष वाबळे, संतोष ननवरे यांसह सर्व नवनियुक्त संचालक मंडळ, कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur Subway | गोखळीच्या भुयारी मार्गावर सकारात्मक निर्णय घेणार : हर्षवर्धन पाटील