बापू मुळीक
पुणे : दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ, पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने आणि सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या, पुरंदरच्या लाल मातीचे भूषण ठरलेल्या ‘पुरंदर केसरी’ कुस्ती स्पर्धेचे उदघाटन आज करण्यात आले.
पुरंदर केसरी स्पर्धेचे उद्घाटन सासवडच्या काळभैरवनाथ कुस्ती आखाड्यात माजी जिल्हा परिषद सदस्य बबुसाहेब माहूरकर, निरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, शरदचंद्र जगताप, बबन कामथे, घनश्याम ताठेले, दिपक हिवरकर, प्रमोद बोरावके यांसह कुस्तीगीर संघाच्या सदस्यांच्या हस्ते महाबली हनुमान आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमापूजन तसेच चांदीची गदा व आखाडा पूजनाने झाले.
माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सलग १९ वर्षे ही स्पर्धा सुरु आहे. याप्रसंगी पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सतिश शिंदे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे राजेंद्र जगताप, सदस्य अशोक झेंडे, तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पांडुरंग कामथे, सचिव रविंद्रपंत जगताप, सदस्य बाळासाहेब कोलते, अभिजित मोडक, भाऊ मोरे, गुलाब गायकवाड, संतोष सोनवणे, शरद जगदाळे, तात्या झेंडे, संतोष काळांगे, हरीभाऊ जेधे, शेखर कटके, तात्या झेंडे, लक्ष्मण दिघे, रघुनाथ जगताप, कानिफनाथ आमराळे, माऊली खोपडे, तानाजी जाधव, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शाखा प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
माजी खासदार अशोकआण्णा मोहोळ, नानासाहेब नवले, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते राज्यात कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले जेष्ठ मल्ल आणि एनआयएस कोच बुवाजी लिमण यांना ‘आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी’ आणि पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील जेष्ठ मल्ल आण्णासाहेब कामथे यांना ‘मल्हार केसरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ तसेच राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतील उपविजेता सार्थक दिघे आणि क-हाकाठचा राजा किताब पटकावलेल्या रितेश मुळीक यांचा आखाड्यात विशेष गौरव होणार आहे.
पंच म्हणून तुषार गोळे, बाबू वरे, अमित म्हस्के, रोहिदास आमले काम पाहत आहेत. प्रसिद्ध कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे यांच्या निवेदनाने आणि कोल्हापूरच्या बापू आवळे बंधूंच्या हलगीवादक ग्रुपच्या हलगी वादनाने आखाड्यात आणखी रंग भरत आहे. दरम्यान, एकूण १० वजन गटांत होत असलेल्या या स्पर्धांत पुरंदर – हवेली मतदार संघातून १७० हून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी सर्व गटांच्या अंतिम कुस्त्या होणार आहेत. जालिंदर काळे यांनी सुत्रसंचलन केले.