सुरेश घाडगे
परंडा : राज्य महामार्ग सांगोला – पंढरपूर – कुर्डूवाडी -परंडा – पाथ्रूड (परंडा ते खानापूर पाटी ग्लोबल स्कुल) रस्त्याची सुधारणा करणे प्रत्यक्ष कामाचे उदघाटन सोमवारी (ता. ३१) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व माजी सभापती तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्ता रणभोर, अशोक गरड, बालाजी नेटके, भिमराव मोरे, कनिष्ठ अभियंता एस.व्ही. टोंपे, एम. एम. कुलकर्णी उपस्थित होते. हे काम सुभाष देशमुख अॅण्ड कंपनी, सोलापूर यांचे वतीने होत असून चांगले काम करण्यात यावे. अशी मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा यांच्याकडे केली आहे.
अनेक महिन्यांपासून हे अर्धवट काम होते. काम सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या भोंगळ व दुर्लक्षीत अकार्यकुशल कामामुळे परंडा शहराला जोडणारे सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत.
दरम्यान, डांबरी रस्त्याला मुरूम मातीची पॅच दिला जातो. त्यामुळे बुजलेले खडडे उखडतात व धुळीचे साम्राज्य पसरते. यामुळे प्रवाशी व परिसरातील व्यावसायीकांना व प्रवाशांचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतू याकडे उपविभागीय अभियंता जे. एल. मळगीकर यांचे दुर्लक्ष आहे. प्रवाशी वर्ग व नागरीक यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.