लोणी काळभोर, (पुणे) : प्रत्येक माणसाचे स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. कोरोना काळात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कोविड योद्धांना घर मालकासह शेजाऱ्यांकडून चांगले अनुभव न आल्याने अनेकांनी आपल्या हक्काचे घर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा स्वतःचा भूखंड घेण्याकडे कल वाढला असल्याचे प्रतिपादन श्रीनाथ डेव्हलपर्सचे चेअरमन नवनाथ शिवले यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायक मंदिराशेजारीच असलेल्या श्रीनाथ डेव्हलपर्स च्या प्रकल्पाचे (प्लॉटचे) उद्घाटन चिखले साहेब(पुणे ग्रामीण एस. पी.) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवनाथ शिवले बोलत होते.
यावेळी दराडे सर, महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रा. लि. चेअरमन दत्तात्रय गोते, उद्योजक संदीप लांडगे, उद्योजक रमेश भुसे, उद्योजक श्रीराम सलगर, संतोष लहाने (यश कन्स्ट्रक्शन), श्रीनाथ डेव्हलपर्सचे ग्राहक व डेव्हलपर्सचे सर्व सहकारी उपस्थित होते. सदर ठिकाणी ५०० गुंठ्यांचे आर झोन प्लॉटस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यावेळी भूखंड खरेदी केलेल्या ग्राहकांना हेलिकॉप्टरची सफर करण्यात आल्याने सदर ग्राहक आनंदीत झाले.
यापुढे बोलताना नवनाथ शिवले म्हणाले, “भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनीही आता नवीन परिसरात जागा खरेदी करून स्वतःच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार सुरू केलेला आहे. स्वतःचे घर बांधण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे योग्य लोकेशनला व परवडनाऱ्या दरात भूखंड (प्लॉट) मिळत असल्यामुळे श्रीनाथ डेव्हलपर्सच्या या प्रकल्पाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत.”