Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Holi 2026 : होळीला ‘हा’ नियम तोडला तर थेट कोठडीची हवा; पोलिसांची तिसरी नजर तुमच्यावर; ‘या’ एका चुकीमुळे तुरुंगात जाल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 16:00
Holi 2026

photo- social media

Holi 2026 : होळी आणि धुळवडीचा उत्साह ओसंडून वाहत असताना कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू नये यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. रंगांच्या या सणात दरवर्षी किरकोळ वाद, छेडछाड, मद्यधुंद वाहनचालक आणि सोशल मीडियावरील भडक पोस्ट्समुळे तणाव निर्माण होण्याच्या घटना घडतात. यंदा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरभर कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Holi 2026)

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होळ्या पेटवल्या जातात आणि धुळवडीला रस्त्यावर रंग खेळला जातो. गर्दीच्या ठिकाणी रंगीत पाणी फेकणे, अश्लील हावभाव किंवा जबरदस्तीने रंग लावणे यामुळे भांडणे होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी वर्गणीच्या वादातूनही तणाव वाढतो. हे टाळण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई, तसेच सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे.

समुद्रकिनारे, चौपाट्या, उद्याने, प्रमुख चौक आणि मोठ्या होळ्यांची ठिकाणे येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात असेल. विशेषतः मिश्र वस्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊ नये यासाठी गस्त वाढवली जाणार आहे. महिलांशी गैरवर्तन, छेडछाड किंवा मारामारीचे प्रकार रोखण्यासाठी सिव्हिल कपड्यातील पथकेही तैनात राहतील.

 

मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहिम राबवली जाणार आहे. नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबत गुन्हेही दाखल होऊ शकतात.

पर्यावरणाच्या दृष्टीनेही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. होळीसाठी बेकायदा वृक्षतोड करू नये, पादचाऱ्यांवर जबरदस्तीने रंग किंवा पाण्याचे फुगे फेकू नयेत, समाजमाध्यमांवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नयेत, तसेच लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

होळी हा आनंद आणि एकोप्याचा सण आहे. काहींच्या बेजबाबदार वर्तनामुळे संपूर्ण सणाला गालबोट लागू नये, यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सामाजिक भान राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. सुरक्षित आणि संयमी साजरी केलेली होळीच खऱ्या अर्थाने रंगतदार ठरेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23
Next Post
Bhigwan

Bhigwan : उपबाजार भिगवणमध्ये नव्या ज्वारीला 6,101 रुपयांचा उच्चांकी दर; शेतकऱ्यांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.