Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पदवीधर निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! शिंदे सेनेचा अपक्षाला पाठिंबा?सामंताच्या ‘त्या ‘भेटीने वार फिरणार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 9:26

पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातील चुरशीनंतर आता पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीतून भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. शिक्षक मतदारसंघात मित्रपक्षांमध्ये झालेल्या चुरशीची पुनरावृत्ती आता पदवीधर मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले भाऊसाहेब आंधळकर यांनी मोठा दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच आंधळकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर, आपल्याला शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा थेट पाठिंबा असल्याचे अंधाळकरांनी जाहीर केले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शिक्षक मतदारसंघात शिंदे सेनेने भाजपविरुद्ध वेगळी भूमिका घेतली होती, तीच रणनीती आता पदवीधर मतदारसंघातही कायम राहिल्यास महायुतीसमोरील अडचणी वाढू शकतात.

या मतदारसंघातून स्मिता जाधव यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव रिंगणात आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सध्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. दुसरीकडे, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत पुण्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुती विरुद्ध मविआ असा थेट सामना रंगला आहे.

उमेदवार भाजपचा असला तरी मित्रपक्षांकडून उमटणारे विसंगत सुर महायुतीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मंत्री उदय सामंत आणि अंधाळकर यांच्या भेटीमागील राजकीय समिकरणांची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी या ताज्या घडामोडींमुळे भाजपचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38

शेवाळवाडीत डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू; दुचाकीस्वार धडक देऊन पसार

Friday, 23 October 2026, 11:30

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

Friday, 23 October 2026, 11:27

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

Friday, 23 October 2026, 11:21

लोणीकंद येथे मोकळ्या माळरानावर गांजा ओढताना तिघांना पकडले रंगेहाथ; खंडोबा माळ परिसरात पोलिसांची कारवाई

Friday, 23 October 2026, 11:16

सासऱ्याशी वाद, मध्यरात्री जावयाने दोन दुचाकी पेटवल्या! हडपसर येथील घटना

Friday, 23 October 2026, 11:09
Next Post

वडील प्राध्यापक, परीक्षेतही अव्वल; तरी नैराश्याने गाठलं!ICTच्या सिद्धेशच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांना पाठवला होता शेवटचा मेसेज..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp