Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 23 October 2026, 11:21

लोणी काळभोर, ता. 23 : किशोरवयीन मुलींना शारीरिक व भावनिक बदलांची योग्य माहिती मिळावी, आरोग्याबाबत जागरूकता वाढावी आणि स्वतःच्या सुरक्षिततेचे भान निर्माण व्हावे, या उद्देशाने लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे यांच्या सामुदायिक आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. 22) हा उपक्रम राबविण्यात आला.

पुण्यातील साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या बी.एस्सी. नर्सिंग तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी सामुदायिक आरोग्य परिचर्या विभागातील क्लिनिकल पोस्टिंगदरम्यान या सत्राचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थिनींना किशोरावस्थेतील आरोग्यविषयक महत्त्वाच्या बाबी सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. या सत्रात मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, किशोरावस्थेतील शारीरिक व भावनिक बदल, महिलांची सुरक्षितता आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व कल्याणासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली.

किशोरावस्थेत होणारे बदल समजून घेणे, मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करणे, स्वच्छतेच्या योग्य सवयी अंगीकारणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे, यावर विशेष भर देण्यात आला. मोबाईलचा वापर आवश्यकतेनुसार आणि योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्वही विद्यार्थिनींना पटवून देण्यात आले. या उपक्रमासाठी प्रा. नमिता पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शोभा पाटील, प्रा. रुपाली शिंदे तसेच क्लिनिकल इन्स्ट्रक्टर कु. प्रियांका कदम, कु. स्मिता पडाळे आणि कु. सिद्धी पिसाळ यांनी सहकार्य केले.

दरम्यान, या आरोग्य जनजागृती सत्रामुळे विद्यार्थिनींना किशोरावस्थेतील आरोग्यविषयक समस्यांची योग्य माहिती मिळण्यास आणि आरोग्यदायी जीवनशैली विकसित करण्यास मदत झाली. शालेय स्तरावर आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून निरोगी समाजाच्या निर्मितीस हातभार लावण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Friday, 23 October 2026, 11:50

भिगवण-राशीन रस्त्यावर कारला कट मारल्याच्या वादातून सात जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

Friday, 23 October 2026, 11:46

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38

शेवाळवाडीत डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू; दुचाकीस्वार धडक देऊन पसार

Friday, 23 October 2026, 11:30

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

Friday, 23 October 2026, 11:27

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

Friday, 23 October 2026, 11:21
Next Post

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp