Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण-राशीन रस्त्यावर कारला कट मारल्याच्या वादातून सात जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 23 October 2026, 11:46

दौंड, ता. 23 : राशीन–भिगवण रस्त्यावर कारला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली आहे. हि घटना खानोटा (ता. दौंड) गावच्या हद्दीत 20 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीज वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात अज्ञात सात जणांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली, तसेच क्रेटा कारच्या पुढील काचेवर दगड मारून काच आणि उजव्या बाजूचा आरसा फोडला आहे.

याप्रकरणी योगेश गोकुळ सराटे (वय 35, रा. राजुरी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सराटे हे शेती व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर बारामती ॲग्रो साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करत होता. ट्रॅक्टरच्या ट्रेलरच्या चाकाची डिस्क खराब झाल्याची माहिती चालकाने दिल्यानंतर सराटे हे आपल्या साथीदारांसह क्रेटा कारमधून चाक घेऊन निघाले होते.

दरम्यान, खानोटा गावच्या हद्दीत रेल्वे पुलावर चढत असताना समोरून येणाऱ्या एका कारने त्यांच्या कारला कट मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर सराटे यांनी संबंधित कारचा पाठलाग करून राजेगावकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ ती थांबवली. चालकाला कट मारण्याबाबत विचारणा केली असता, दोघांमध्ये वाद सुरू झाला.

दुसऱ्या कारमधून आलेल्या पाच जणांचाही सहभाग

 

या वादादरम्यान संबंधित कारमधील व्यक्तीने सराटे आणि त्यांच्या साथीदारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाटा पंच ईव्हीमधून आणखी पाच जण घटनास्थळी आले. या सर्वांनी मिळून धक्काबुक्की व मारहाण केली, तसेच क्रेटा कारच्या पुढील काचेवर दगड मारून काच आणि उजव्या बाजूचा आरसा फोडून नुकसान केले आहे. या घटनेप्रकरणी कारमधील आणि टाटा पंच ईव्हीमधील एकूण सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार पानसरे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

Friday, 23 October 2026, 11:50

भिगवण-राशीन रस्त्यावर कारला कट मारल्याच्या वादातून सात जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

Friday, 23 October 2026, 11:46

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचे टेनिक्वाइट स्पर्धेत जिल्ह्यात वर्चस्व; पाच संघांची विभागीय स्तरावर निवड

Friday, 23 October 2026, 11:38

शेवाळवाडीत डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू; दुचाकीस्वार धडक देऊन पसार

Friday, 23 October 2026, 11:30

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,000 कधी जमा होणार? कृषिमंत्र्यांनी सांगितली थेट तारीख; प्रतीक्षा संपणार..

Friday, 23 October 2026, 11:27

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी आरोग्य जनजागृती; साधू वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंगचा स्तुत्य उपक्रम

Friday, 23 October 2026, 11:21
Next Post

मुंबईच्या CSMT स्थानकात अचानक छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp