UP Hathras : उत्तर प्रदेशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडली आहे. सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे.
चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना हाथरसच्या रतिभानपूर भागातील असल्याची माहिती आहे. भोले बाबांच्या सत्संगाचा समारोप सोहळा सुरू असतानाच चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं आहे.
27 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी..
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली, त्यात 23 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एटा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी दिली आहे. दरम्यान, मृतांमध्ये दोन पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. शवविच्छेदन तपासणी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत.