वडूज, : खटाव तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते हाजी जब्बार हाजी अल्लाबक्ष मुल्ला वय ६७ यांचे अल्पशा आजाराने वडूज ता खटाव येथे निधन झाले.
वडूज शहरानजिक वाकेश्वर रोड येथे२०१७ साली मुस्लिम समाजाच्या वतीने भव्यदिव्य ईदगाह भिंत बांधण्यात आली.त्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते.वडूज शहरातून हाज यात्रा करण्यासाठी जाणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये मुस्लिम समाजातील हाजी जब्बार हाजी अल्लाबक्ष मुल्ला हे एक होते. त्यांच्या निधनाने मुस्लिम समाजात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सर्वधर्मसमभाव मानणारे ते पुरोगामी व्यक्तिमत्त्व होते.राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्री अशोकराव गोडसे, ऍड. बाबा शिंदे यांचे जिवलग मित्र होते तर कटगुण ता खटाव येथील हजरत मलंग शाह बाबा यांचे ते सेवेकरी होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली बहिणी , भाऊ ,सून, नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार होता. ते शिवशक्ती मंडळाचे संस्थापक सदस्य व वडूज मुस्लिम समाजातील ट्रस्टचे ट्रस्टी आणि सामाजिक कार्यकर्ते इरफान मुल्ला यांचे वडिल होते. मुस्लिम समाजातील धार्मिक विधी जियारत (सावडणे विधी ) शुकवारी दि. २९ रोजी सकाळी नऊ वाजता वडूज कबरस्थान येथे होणार आहे.