सुरेश घाडगे
परंडा : श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळभैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बुधवार ( दि. १३ ) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्ताने सोनारी जि. प. शाळेतील गुरुजनांचा सन्मान व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान गुरुपौर्णिमा निमित्त सकाळी ८ वा. श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांना महाअभिषेक व महापुजा करण्यात आली.
यावेळी हिंदकेसरी डी.वाय.एस.पी.वर्धा सुनील साळुंखे, भै.दे.ट्रस्ट विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती नवनाथ जगताप, अंभीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, मेजर महावीर तनपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रायगड, महेश कदम, वस्ताद भारत भोसले, पिंटु साळुंखे या मान्यवरांच्या हस्ते वर्ग १ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय महाराज पुजारी यांनी केले तर सुत्रसंचालन व ट्रस्टचे उपाध्याय ॲड. विवेक काळे यांनी केले.
श्री काळभैरवनाथ यांची महाआरती महानैवेद्य करुन सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
यासाठी मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी, समीर पुजारी, मयुर पुजारी, सागर पुजारी, जितेंद्र वाडेकर, महावीर हांगे, अभिजीत कुलकर्णी, केशव फले, क्रुष्णा घाडगे, डॉ. पोपट गायकवाड, भैरवनाथ जाधव, अक्षय नीळ, ज्ञानेश्वर घुले, रुषीकेश डोके, पिनू वाडेकर, दत्ता गाडे आदिनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.