Solapur News : सोलापूर : एकदा लग्नाची गाठ बांधली की ती सात जन्मासाठी अतूट असते. असे मानले जाते. परंतू आजकाल लग्न होताच अवघ्या सहा महिन्यात ती तुटतात देखील. यामुळे संसार आणि मुले उघड्यावर पडत आहे. ही समस्या अनेक समाजात घडत आहे, अशा घटनांवर किंचितसा प्रभाव पडावा या उद्देशाने सुखाने संसार करणाऱ्या व लग्नाचं अर्धशतक ठोकणाऱ्या आठ आजी-आजोबांचा पुन्हा विवाह सोहळा (महोत्सवम्) लावण्यात आला. (Grandparents in their fifties again ‘in the shackles of marriage’)
गोरज मुहूर्तावर गुलाब पाकळ्यांच्या अक्षतारुपी शुभेच्छांनी आजी-आजोबा या निमित्ताने चिंब चिंब झाले.
सोलापुरातील अभिनव कार्यक्रम
दाजी पेठेतील श्रीराम मंदिर येथे प्रारंभी श्री गणेश पूजा, श्री लक्ष्मी-नारायण पूजा व महर्षी मार्कंडेय महामुनींचे पूजा अनुक्रमे यंत्रमाग कारखानदार रघुरामुलू कंदीकटला, (Solapur News) सामाजिक कार्यकर्ते गोपीकृष्ण वड्डेपल्ली आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या यांच्या हस्ते करून आठ जोडप्यांना कंदीकटलातर्फे टोपी, टॉवेल, वड्डेपल्लीतर्फे साडी-चोळी आणि कोठेंतर्फे पुष्पहार देण्यात आले.
पद्मशाली पुरोहित संघमने केले पौराहित्य
यावेळी आजी-आजोबा एकमेकांना हार घातल्यावर पद्मशाली पुरोहित संघमच्या वतीने आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. (Solapur News) ‘अक्षता’ म्हणून तांदळाऐवजी गुलाब पाकळ्यांचा उपयोग करण्यात आला.
या नवीन संकल्पनेमुळे वऱ्हाडी आणि जोडपे यांना वेगळेच वाटले. (Solapur News) विवाह सोहळ्यानंतर जोडप्यांच्या (आजी-आजोबा) घरी रात्रीचे भोजन नातेवाईकांसाठी केल्याने पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या लग्नाच्या आठवणी ताज्या झाल्याने सर्वच आनंदात होते.
पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष देविदास अन्नलदास यांच्या मार्गदर्शनाखाली वेणुगोपाल म्याना, ओमप्रकाश सामल, अविनाश श्रीमल, अरविंद जिल्ला, हरिकृष्ण नल्ला, नागेश अंकम, सुधीर सोमा यांनी पौरोहित्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur News : सोलापूरात कौटुंबिक वादाचा भयानक अंत; पत्नीची गळा कापून हत्या; अन् पतीचीही आत्महत्या
Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!