उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे मागील सात वर्षातील कार्य हे गावच्या विकासाला वेगळी दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांनी केले.
उरुळी कांचन येथील ड्रिम्स युवा सोशल फौंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या दर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी विद्यालयातील रवींद्र कला मंदिर हॉल या ठिकाणी रविवारी (ता. २१) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उदघाटक म्हणुन प्रा. के. डी कांचन बोलत होते.
या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व रक्तदान शिबिरात ३२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात ३१९ पुरुष व २ महिलांचा समावेश होता. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक तुळशीचे रोप, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र बबन कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन, अजिंक्य कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित (बाबा) कांचन, सुनील तांबे, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाऊसाहेब तुपे, सुभाष बगाडे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप, हवेली तालुका सोशल मीडिया परिषद उपाध्यक्ष सचिन माथेफोड, सुवर्णा कांचन, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, शांताराम चौधरी, किरण वांजे, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, शिवाजी नवगिरे, रमेश महाडिक, सोमनाथ बगाडे आदि मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढे बोलताना प्रा. के. डी. कांचन “ग्रामस्वच्छता ग्रुप स्वच्छतेचे, आरोग्य, रक्षणाचे, पर्यावरण रक्षणाचे विचार देत आहेत, आम्ही गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील आहोत.”
दरम्यान, मागील सात वर्षापासून हा ग्रुप उरुळी कांचनसह परिसरात संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, ५ हजारावरून अधिक झाडे लावून, संवर्धन करण्याचे काम पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचे कार्य जोमाने करीत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर व पालखी मार्ग स्वच्छता मोहीम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात मार्च २०२० ते मे २०२१ बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालय आणि ग्रूपच्या वतीने चार वेळा रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सुमारे ५५६ रक्त पिशवीचे संकलन करून आरोग्यक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.