Gram Panchayat lection result 2023 पुणे : राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. महायुती आणि महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होती. अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली. निकालात मात्र महायुतीने बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याचे ‘दादा’ अजित पवार ठरल्याचे स्पष्ट होत आहे. शरद पवार गटाची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. तर एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देत, आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे. त्यात अजित पवार यांनी चांगलेच वर्चस्व मिळवले. शरद पवार यांची पिछेहाट झाली आहे. बारामती तालुक्यात अजित पवार यांच्या गटानेच वर्चस्व निर्माण केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित दादा यांची दादागिरी दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण जनता अजित पवार यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर असल्याचे सिद्ध झाले आहे. शरद पवार गटाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीतील ही पहिली निवडणूक नव्हती. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची कामगिरी चांगली झाली होती. आता मात्र त्यांनी उद्धव ठाकरे गटाला मागे टाकले आहे. ग्रामीण भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत आल्याचा फायदा झाला आहे.