पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर सर्व स्तरातून रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर टीका केली जात आहे. अशाच आता या प्रकरणाबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली असून प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात डॉ. घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुर्हाड कायम असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात विविध स्तरांमधून चौकशी आणि त्यातून झालेली कारवाईही समोर आली आहे. आता राज्य सरकारकडून प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार असल्याच समोर आल आहे त्यामुळे सरकारी पातळीवर या संदर्भातील कारवाईला वेग आला आहे. दरम्यान पुणे पोलीस डॉ घैसास यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा महत्त्वाचा अहवाल
1) वैद्यकीय शिक्षण विभागाची चौकशी
पुणे पोलिस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल
2) सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी
– इंडियन मेडिकल कौन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याने मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून डॉ. घैसास आणि त्यांच्या कर्मचार्यांवर कारवाई करावी.
– महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 नुसार पुणे महापालिकेने कार्यवाही करावी.
– मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 चा भंग झाल्याने विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाई करावी.
3) विधी व न्याय विभाग चौकशी
– दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड.
– यातून प्रत्येकी 5 लाखांच्या एफडी होणार. दोन्ही मुली सज्ञान झाल्यावर व्याजासह त्यांना ही रक्कम द्यावी.
– या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून याचा निर्णय आधीच घेण्यात आला.
दरम्यान धर्मदाय रुग्णालय व्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित
1) आता धर्मदाय रुग्णालयातील रुग्णसेवा ही संपूर्णत: ऑनलाईन ठेवावी लागणार.
2) त्यांचे केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातून होईल.
3) धर्मादाय रुग्णालयात येणार्या कोणत्याही रुग्णाला अॅडव्हान्स मागता येणार नाही.
4) धर्मादाय रुग्णालयाने 10 टक्के निधी हा गरिब रुग्णांसाठी वापरला की नाही, याचे लेखे नियमितपणे सादर करावे लागणार