गणेश सुळ
Pune News केडगाव : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने गावागावात शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत गावातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र दौंड तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये मात्र या उपक्रमाच्या दिवशी अनेक कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने या शासकीय उपक्रमाचा शासकीय कर्मचार्यांमुळेच फज्जा उडाला आहे. (Pune News)
नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तावेज उपलब्ध करून देण्यासाठी या या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अधिकारी व कर्मचारी एका छताखाली गावनिहाय एकत्र येऊन शिबिराचे आयोजन करून विविध योजनांचे लाभ नागरिकांना होईल.(Pune News)
‘शासकीय कर्मचार्यांमुळेच उडाला फज्जा
या अनुषंगाने देलवडी, गार येथे या शिबिराचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. मात्र सकाळपासूनच शासकीय आधिकर्यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला एक प्रकारे केराची टोपली दाखवली आहे. .
ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र, ग्रामस्थांनी या शिबिराला एकत्र येत शासकीय कर्मचार्यांच्या आगमनासाठी किती वेळ वाट ताटकळत बसायचे, हाच खरा प्रश्न उपस्थित झाला होता.(Pune News)
गावात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि वैद्यकीय अधिकारी हे कर्मचारी उपस्थित असतात. पण या व्यतिरिक्त इतर विभागाच्या कामासंदर्भातील कोणीही शासकीय कर्मचारी हजर नसल्या कारणाने ‘शासन आपल्या दारी’चा फज्जा उडाला. यावेळी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचतगट महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Pune News)
याबाबत बोलताना नंदु भागवत म्हणाले कि, शासन आपल्या दारी ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केली. ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल हा हेतू शासनाचा आहे, पण जर शासनाच्या काही कर्मचार्यांनीच या योजनेत आपला सहभाग न नोंदवता गैरहजर राहून या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मग ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली व्यथा कोणाकडे मांंडावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा आहे.