पुणे – इंडियन ऑइलने आज महिन्याचा पहिल्याच दिवशी गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलास मिळाला आहे. LPG सिलेंडरच्या (Cylinder) दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पण ही कपात घरगूत सिंलेडरवर नाही तर व्यावसायिक सिलेंडरवर (Commercial Cylinder) करण्यात आली आहे. आज इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या किमतींनुसार, 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
इंडियन ऑइलने (Indian Oil) आज नव्याने जाहीर केलेल्या किमतींनुसार आजपासून मुंबईत (Mumbai) व्यावसायिक सिलेंडरचा दर 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी तो 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता पण LPG व्यावसायिक सिलेंडरचा दर 36 रुपयांनी कमी केल्यामुळे व्यावसायिक सिलेडर वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
देशातील वेगवेगळ्या शहरात व्यावसायिक सिलेंडरच्या वेगवेगळ्या किमती असतील.दिल्लीत (Delhi) पूर्वी 2012.50 रुपयांना मिळणार 19 किलो व्यावसायिक सिलेंडर आता 1976.50 रुपयांना मिळेल. तर कोलकत्यात (Kolkata) याचं LPG व्यावसायिक सिलेंडरसाठी 2095.50 तर तर चेन्नईत (Chennai) 2141 एवढी रक्कम मोजावी लागेल.
LPG व्यावसायिक सिलेंडरचा दर 36 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल. घरगूत सिलेंडरवर मात्र दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी घरगूती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती पण तेव्हापासून घरगूती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल करण्यात आलेले नाही.