पुणे : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाकडून तब्बल चार हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. गुरुवार (ता.२० ) नोंदणी तर शुक्रवार (ता. २१) रोजी अर्जविक्री स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
तसेच पुणे म्हाडाकडून एकूण ११ ऑनलाईन सोडत काढण्याचा मानस असून त्यापैकी ७ सोडत आतापर्यंत काढण्यात आल्या आहेत. पुणे , पिंपरी चिंचवड, सांगली , सोलापुरामध्येही घरे मिळणार आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये आपले हक्काचे घर घेण्याची एक उत्तम संधी सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार (ता. २०) रोजी सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरे असणार आहे.