पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्या -चादीच्यां दरात सातत्याने चढ -उतार होताना दिसत आहे. आता आज भारतीय बाजारात सोन्या -चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करणारी ही दरवाढ नसून मोठी कपात आहे.आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 तोळ्यांमागे तब्बल 4,900 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे आज 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याची किंमत 1,44,330 रुपये इतकी झाली आहे.तसेच चांदीच्या दरात किलोमागे 5000 रुपयांची घसरण झाली आहे.

आज बाजार उघडताच चांदीच्या दरात मोठी पडझड झाली आहे. प्रति किलो (1,000 ग्रॅम) चांदी थेट 5,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. कालपर्यंत 100 ग्रॅम चांदीसाठी 24,000 रुपये मोजावे लागत होते, तेच दर आज 23,500 रुपयांवर आले आहेत.चांदीचे आजचे ताजे दर:1 ग्रॅम: 235 रुपये, 10 ग्रॅम: 2,350 रुपये, 100 ग्रॅम: 23,500 रुपये, 1,000 ग्रॅम (1 किलो): 2,35,000

येत्या काही दिवसांत चांदीच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.सोन्याचे भावही उतरले असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
कॅरेटनुसार आजचे शुद्ध सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:
24 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम: आजचे दर 14,433
8 ग्रॅम: आजचे दर 1,15,464
10 ग्रॅम: आजचे दर 1,44,330
100 ग्रॅम: आजचे दर 14,43,300
22 कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)
1 ग्रॅम: आजचे दर 13,230
8 ग्रॅम: आजचे दर 1,05,840
10 ग्रॅम: आजचे दर 1,32,300
१०० ग्रॅम: आजचे दर १३,२३,०००
मुंबई, पुणे आणि दिल्ली सराफा बाजारातसोन्याचे दर घसरेलले आहेत . मुंबईसह दिल्लीतील नागरिकांना सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. गुड रिटनर्स नुसार, मुंबई, पुणे आणि दिल्लीचे दर पुढील प्रमाणे. मुंबई पुण्यात 24 की सोन्याचे दर 14,433, 22 k सोन्याचे दर 13,230 इतके आहेत तर, 18की सोन्याचे दर 10825 इतके आहेत. तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे.







