Pune News : पुणे : सुरक्षेसंबंधित कारणांमुळे विमानतळावर एका प्रवाशाच्या कागदपत्रांची साधारणपणे तीन वेळा तपासणी होते. यामुळेच प्रवाशांना किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना करण्यात येत असते. प्रवाशांचा हाच वेळ वाचवण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने डिजीयात्रा नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचेल, तसंच सुरक्षारक्षकाकडे कागदपत्रे तपासण्याची गरज भासणार नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्यात ही सेवा पुणे विमानतळावर (लोहगाव) सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना सुलभ ‘चेक-इन’साठी सुरू केलेल्या ‘डिजि यात्रा’ सुविधेचा वापर २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात या सुविधेच्या वापराच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली असून, पुणे हे देशातील सात शहरांमध्ये तिसरे शहर ठरले आहे. विमानतळावर प्रवेशासाठी ‘प्रवाशांचा चेहरा हाच पासपोर्ट,’ अशी सेवा असलेली ‘डिजि यात्रा’ सुविधा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरू केली आहे.(Pune News)
डिजीयात्रा नामक एक नवीन प्रणाली विकसित.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतेच देशातील तीन विमानतळांसाठी ‘डिजी यात्रा’ प्रणालीचा शुभारंभ केला. ही सुविधा पहिल्या टप्प्यात दिल्ली, वाराणसी, बंगळुरू येथे प्रायोगिक तत्त्वावर डिसेंबर २०२२मध्ये सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात पुणे, वाराणसी, कोलकता, दिल्ली, हैदराबाद, विजयवाडा येथील विमानातळावर तिचा वापर सुरू झाला. एक एप्रिलपासून ही सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे गर्दी असणाऱ्या विमानतळांवर प्रवाशांना दिलासा मिळतो.(Pune News)
‘डिजी यात्रा’ प्रणाली काय आहे?
देशातील तीन विमानतळांवर फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी (FRT) अर्थात चेहरा ओळख प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला एका मोबाईल अॅपचा वापर करावा लागणार आहे. या तंत्रज्ञानाला एकत्रित स्वरुपात डिजी यात्रा प्रणाली असे नाव देण्यात आले आहे.(Pune News) डिजी यात्रा प्रणालीचा वापर केल्यास प्रवाशांना विमानतळावरील गेटवर कोणतीही कागदपत्रे न दाखवता थेट प्रवेश मिळू शकतो. यामध्ये आपल्या आधारकार्डवरील माहिती, तसंच आपण प्रवासापूर्वी अपलोड केलेली माहिती यांचा उपयोग करण्यात येईल. सध्या तरी ही सेवा केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठीच सुरु करण्यात आली आहे. प्रवासी ‘सिक्युरिटी चेक-इन’ करताना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे (सीआयएसएफ) जवान संबंधित प्रवाशाचे स्कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी(Pune News) करतात. यामध्ये प्रवाशांचा वेळ वाचतो.
कोणत्या विमानतळांवर मिळणार सुविधा?
डिजी यात्रा प्रणालीमार्फत विमानतळावर थेट चेहरा स्कॅन करून प्रवेश देण्याची सुविधेची सुरुवात पहिल्या टप्प्यात देशातील ७ विमानतळांवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन १ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आला. दिल्लीसह वाराणसी आणि बंगळुरू या शहरांच्या विमानतळांवरही चेहरा स्कॅन करून प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर मार्च २०२३ पर्यंत ही प्रणाली हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा या ४ विमानतळांवर सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील इतर काही विमानतळांवर ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.(Pune News)
याबाबत बोलताना लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष डोके म्हणाले की, पुण्यातून दिवसाला १८० उड्डाणे होतात. त्याद्वारे २६ ते २८ हजार प्रवासी प्रवास करतात. जून अखेरपर्यंत पुणे विमानतळावर १,०४,००० प्रवाशांनी डिजि यात्रा अॅपचा वापर केला. हे प्रमाण एकूण प्रवाशांच्या तुलनेत ११.९० टक्के होते; पण, जुलैमध्ये ते २५ टक्क्यांपर्यंत वाढले. पुणे विमानतळावर दोन विमान कंपन्यांकडून डिजि यात्रा सुविधेचा वापर अद्याप केला जात नाही. त्यांना ही सुविधेसाठी परवानगी मिळाल्यास ती वापरणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल. पुणे विमानतळावरील दोन प्रवेशद्वारांवर ‘डिजि यात्रा’ सेवा सुरू आहे. सध्या दिवसाला २५ टक्क्यांपेक्षा अधिक जास्त नागरिक डीजी यात्रा सुविधेचा वापर करत आहेत. येत्या काळात ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या निश्चित वाढेल.(Pune News)