युनूस तांबोळी
शिरूर : अंजूमन इत्तेहाद तंबोळीयान जमात शिक्षण व कल्याण संस्था महाराष्ट्र राज्यची वार्षीक सर्वसाधारण सभा अहमदनगर येथे मंगळवार ( ता.२० ) सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती जमातचे अध्यक्ष हाजी मोहम्मद कासीम तंबोली यांनी दिली.
अहमदनगर येथील ताज गार्डन मध्ये होणाऱ्या या सभेस सचिव हाजी इस्माईल तंबोली, खजीनदार हाजी अब्दूल कादर तंबोली, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य हाजी शौकत तंबोली, हाजी गुलामहुसेन तंबोली तसेच सर्व जिल्ह्यातील तंबोलीयान जमातचे नागरिक उपस्थित राहणार आहे.
या सभेत तिलावते कुराण, मागील सेभेचे इतिवृत्त कायम करणे, तंबोली जमातीच्या सर्वागिण विकासासाठी बनविलेल्या वैबसाईट, डीजीटल खानेसुमारी पोर्टलचे उदघाटन करण्यात येईल. तंबोली जमातीच्या पोर्टलव्दारे शैक्षणिक ओबीसी दाखला, स्कॅालरशीप, शैक्षणीक कर्ज, करीयर गायडन्सची प्रोजक्टर व्दारे तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे. यातून जमातीच्या मुला मुलींना शिक्षण, उच्च शिक्षण घेण्यास सोयीस्कर होणार आहे.
डीजीटल खानेसुमारीची प्रोजेक्टरवर माहीती देण्यात येणार आहे. तंबोलीयाम जमातीच्या विवाहइच्छूक मुला-मुलींचे बायोडेटा याबाबत माहीती दिली जाणार असून बेरोजगारीचा प्रश्न मिटविण्यासाठी व्यवसाय व नोकरी संदर्भात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील वर्षीसाठी नव्याने कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. यासाठी अहमदनगर येथील अंजूमन इत्तेहाद तंबोळीयान जमात शिक्षण व संस्था महाराष्ट्र राज्यची वार्षीक सर्वसाधारण सभेला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.