राजु देवडे / लोणी धामणी (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील गणेश दिलीप काकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट) ओ.बी.सी.सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते पुणे येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे ,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ध्येय-धोरणे, आचार-विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष अधिक बळकट करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश काकडे यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप गारटकर (पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ) सुरेश घुले (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) सचिन घोटकुले ( युवक अध्यक्ष पुणे जिल्हा) दिलीप वाल्हेकर, जयवंतराव कवितके, बाळासाहेब डफळ,नवनाथ गवते,राजू काकडे, संकल्प काकडे, निलेश काळे , श्रावण काकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.