अजित जगताप
सातारा : वडूज शिक्षण विकास मंडळ,वडूज ता खटाव या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज नगरीत गुणवंत विद्यार्थी, पालक,गुरुजनांचा संयुक्त सत्कार करण्यात आला. यावेळी बुद्धीची देवता गणराय तर अल्लाने हुशार लोकांना बुद्धिमत्तांची देणगी दिली. असे प्रतिपादन आदर्श शिक्षक ए जी भंडारे यांनी केले.
या सत्कार समारंभाला वडुजच्या नगराध्यक्षा सौ मनिषा काळे, युवा उधोजक इम्तियाज बागवान, एस व्ही भंडारे, दशरथ गोडसे, विजय शिंदे, पर्यवेक्षक बी एस माने, एन एस दौंड, डी जे फडतरे, प्रा एम एस गोडसे, एस डी धनावडे, धुळप सर, एस डी घनवट, तानाजीराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गणराय ही बुद्धीची देवता आहे. त्यांच्या गणेशोत्सव काळात गुणवंतांचा सत्कार होत आहे.इस्लाम धर्मात ११४ सुरा आहेत त्यामध्ये ९९ क्रमांकावरील १३ व १४ सुरा मध्ये महंमद पैगंबर यांनी बुद्धिमत्ता ही अल्लाची देणगी आहे असे ही सांगितले आहे. जो बुद्धी धारण करतात ती व्यक्ती समाज्याचे हित साधत आहे. असे स्पष्ट करून भंडारे सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांची इतिनुभूत माहिती उपस्थिती विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते एन एम एम एस परीक्षा, विज्ञान परिषद व खेळात प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी सत्कार करण्यात आले. गुणवंत विद्यार्थी प्रल्हाद भंडारे,गोडसे,अभिषेक पवार,संस्कृती निकम,इर्षा रोमण, स्वप्नाली जाधव, यश तुपे व इतर विद्यार्थी, पालक यांचा शाल, श्रीफळ व प्रमाण पत्र फ्रेम देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला.
दरम्यान, ‘आमची शाळा लय भारी,,, आमचे गुरुजन लय भारी,,, आमचे विद्यार्थी लय भारी,, असे एका ताला सुरात घोषणाबाजी करण्यात आली.युवा उधोजक इम्तियाज बागवान यांनी कोरोना काळात या शाळेला मोफत मास्क व औषध दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. विजेते हे संघर्षातून तयार होत असतो. त्यांचा गुणगौरव पाहताना पालकांनाही मनस्वी आनंद वाटत होता.
शंकर पवार यांनी शाळेच्या उभारणीसाठी सहकार्य केले त्याच शाळेत तीन पिढ्यांनी शिक्षण घेतले आहे. अशी माहिती पालक तानाजीराव पवार यांनी दिली. तसेच नववी, फ वर्गातील विद्यार्थीनी हिने वीस वर्षांत पहिल्यांदा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला असल्याचे सांगितले.यावेळी पालक वर्ग तसेच एस एस जामदार, एस पी चव्हाण, एस डी मुजावर, एस ए पवार,फडतरे,जगदाळे, पंडित सर, संयोजक ए जी भंडारे यांचा ही यतोचित सत्कार करण्यात आला.