उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा क्रीडा परिषद व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक, विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव अजिंक्य कांचन यांनी दिली.
क्रीडा परिषद पुणे व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत एकूण 110 संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी विद्या निकेतन विद्यालय चाकण, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, डी. वाय पाटील विद्यालय तळेगाव, ऑलमपस स्कूल भांडगाव व हॅचिंग स्कूल तळेगाव दाभाडे यांचा पराभव करून डॉ. अस्मिता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व विद्यालयाच्या शिरपेचात एक आणखी मानाचा तुरा रोवला.
दरम्यान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शंकर वाईकर, विद्यालयाच्या प्राचार्य रोहिणी जगताप व उपप्राचार्य कांचन चव्हाण यांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांवरती कौतुकाचा वर्षाव केला.