पुणे : व्यसनमुक्ती विषयावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड २०२३’, ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ या संस्थांनी घेतली आहे. इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अगोदरच त्यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे.
मात्र, समुपदेशन, वर्तमानपत्र, मासिक, सोशल माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे काम गिते यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले असून, यापूर्वी त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
दरम्यान, गीते यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२, राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२२ असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, स्व. मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.