पुणे : श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, कानगाव व आयुर इंडिया चॅरिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जर्मन टेक्नॉलॉजीच्या साह्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कानगाव येथे संपन्न झाले. शिबिराची सुरुवात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, भीमा पाटस, सहकारी कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग गवळी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन उत्तम खांदवे व माजी अध्यक्ष दत्तात्रेय फडके, दौंड-शिरूर तालुका ज्येष्ठ नागरिक संंघ समन्वय समिती अध्यक्ष डाॅ.पांडुरंग लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्काॅम) मुंबई प्रादेशिक पुणे विभाग दौंड-शिरुर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती अंतर्गत श्री.भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ कानगांव व आयुर इंडिया चॅरिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ रोजी ग्रामीण भागात, प्रथमच जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साहाय्याने आरोग्य तपासणी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात एकुण १४१ रूग्णांनी तपासणीचा व गरजवंत ४५ रूग्णांनी सवलतीत औषध खरेदीचा लाभ घेतला.
प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरूकता अभियान, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. प्रवीण बढे यांच्या सहकार्याने प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरिटी फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून एकुण ४५ रूग्णांना सवलतीत आयुर्वेद औषधी पुरविण्यात आल्यात. मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करुन श्री. भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ कानगाव यांनी समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपत नागरिकांना एक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली याबद्दल डॉ.पांडुरंग लाड यांनी संघाचे कौतुक केले.
यावेळी दौंड-शिरुर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रंगनाथ शितोळे, कोषाध्यक्ष भास्कर ताकवणे, सदस्य दादासाहेब फराटे यांसह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री.भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ कानगावचे संस्थापक अध्यक्ष संपत जगताप, उपाध्यक्ष नामदेव निगडे, सचिव उध्दव गवळी, सदस्य बबन चौंडकर, डाॅ.सचिन पवार , ओंकार जगताप, हर्षाली ढिले
सुखदेव अडसुळ, बाबुराव निगडे, चंद्रकांत चाबुकस्वार, डॉ. बाबुराव फडके, डाॅ. शामल फडके, महादेव निगडे, माजी सरपंच सुरेश फडके यांनी सहकार्य केले.