Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर अपर तहसीलच्या भूमिकेमुळे हजारो शेतकरी अडचणीत…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 June 2024, 15:21
farmers are in trouble due to upper tahsil office haveli pune

संदीप बोडके
लोणी काळभोर : पुर्व हवेलीत सुरू असलेल्या सामाईकातील अकरा गुंठेच्या फेरफार नोंदी अचानकपणे रद्द होऊ लागल्या आहेत. यासाठी तहसीलदार मंडल अधिकाऱ्याकडे, तर मंडल अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाकडे बोट दाखवत आहे. मात्र, यामुळे हजारो शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत नागरिकांनी आमदार अशोक पवार व पैलवान संदीप भोंडवे यांच्याकडे तक्रारी करत दाद मागितली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्त नोंदणीचा कायदा एकच असताना पुर्व हवेलीत, मात्र त्या कायद्यास बेकायदेशीर ठरवून प्रमाणभूत क्षेत्राच्या नोंदी थांबविण्यात आलेल्या आहेत. अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या म्हणण्यानुसार प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदी बेकायदेशीर असतील, तर संपूर्ण जिल्ह्यात यापुर्वी झालेल्या व सध्या सुरु असलेल्या नोंदी रद्द करण्यात याव्यात. तसेच अशा प्रकारे बेकायदेशीर नोंदी करणारे तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे संदीप भोंडवे यांनी केली आहे.

खरेदी दस्ताच्या नोंदी सातबारा सदरी करत असताना, पुर्व हवेली तालुका वगळता संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्ती ग्राह्य न धरता प्रमाणभूत क्षेत्र ग्राह्य धरुन सातबारा सदरी नोंद घेतली जाते. परंतु, पुर्व हवेली तालुक्याच्या अपर तहसील कार्यालयाच्या भूमिकेमुळे प्रमाणभूत क्षेत्र ग्राह्य न धरता व्यक्ती ग्राह्य धरल्याने प्रमाणभूत क्षेत्राच्या सर्व नोंदी रद्द करण्यात येत आहेत. पुरंदर, दौंड, खेड व शिरुर तालुक्यासह इतर तालुक्यात प्रमाणभूत क्षेत्र सामुहिक खरेदीदस्ताच्या नोंदी सातबारा सदरी होत असताना, पुर्व हवेलीत मात्र बेकायदेशीर नोंदीचे कारण देत त्या सातबारा सदरी रद्द होत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनता‌ व शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी २३ फेब्रुवारी २०२४ ला परीपत्रक काढत सामाईक खरेदी खताच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या नोंदी अभिलेखात करू नये, अशा सूचना सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना केल्या होत्या. परंतु, त्यामध्ये प्रमाणभुत क्षेत्र किती जणांनी खरेदी करायला हवे, याबाबत कोणताच खुलासा केलेला नाही. बागायती क्षेत्रात १० गुंठे व जिरायतमध्ये २० गुंठे क्षेत्र एका व्यक्तीच्या नावावर खरेदीदस्त असेल तरच नोंद करावी, अशा तोंडी सुचना तहसीलदार कोलते यांनी सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे संदीप भोंडवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सातबारावरील फेरफार नोंदीच्या विसंगत नियमाबाबत जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेणार आहे. तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पुर्व हवेलीतील फेरफार नोंदीबाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे.
आमदार अशोक पवार (शिरूर-हवेली)

अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महसूली अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे साशंकता निर्माण झाली आहे. अपर तहसीलसह पुणे जिल्ह्यात प्रमाणभूत क्षेत्राच्या फेरफार नोंदीबाबत एकच नियम असावा. जर चुकीच्या नोंदी झाल्या असतील, तर त्या तात्काळ रद्द कराव्यात. चुकीच्या नोंदी ज्यांच्या कार्यकालात झालेल्या आहेत, त्या संबंधित तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री (नागरी विमान वाहतूक व सहकार) मुरलीधर मोहोळ व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पैलवान संदीप भोंडवे (अध्यक्ष-महाराष्ट्र क्रीडा प्रदेश आघाडी)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये राडा; बराकीत बसलेल्या कैद्याला मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp