युनूस तांबोळी
शिरुर – शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरूर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कवठे येमाई, जांबूत, मलठण येथे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.
यावेळी निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, आदर्श सरपंच दामूशेठ घोडे,पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, चेअरमन बन्सीशेठ घोडे, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात, क रामदास सांडभोर, माजी सरपंच बबनराव पोकळे, मिठुशेठ बाफना, हिरामन कर्डिले महाराज, माजी उपसरपंच कानिफनाथ हिलाळ, बाजीराव उघडे, ग्रामपंचायत सदस्य पांडाशेठ भोर, बाळशिराम मुंजाळ, चंद्रकांत इचके, निलेश पोकळे,रंगनाथ भोर, फक्कड सांडभोर, सावकार इचके, रामभाऊ पवार,बाबुराव रोहिले, अशोक गावडे, रमेश पोकळे, जयसिंग इचके, गणेश रत्नपारखी, अरुण हिलाळ, रमेश खाडे, सुखदेव दिवेकर, बबुशा रोहिले, खंडू गावडे,भाऊसाहेब पोकळे, रोहिदास हिलाळ, भाऊ बजाबा रोहिले, नवनाथ रोहिले, बाळू पोकळे, शहाजी रोहिले, माऊली पंचरास , तसेच टाकळी हाजी चे उपसरपंच गोविंद गावडे, अशोक गावडे, भरत खामकर, बाळासाहेब जाधव, दत्ता दिवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष घोडे, अशोक मेचे,म्हतारबा खाडे, नारायण कांदळकर, भाऊ उचाळे, सावकार घोडे, अमोल रसाळ, मारुती नरवडे, गणेश भोसले, सुरेश बारहाते,शेखर घोडे, बाबाजी उचाळे, गणेश घोडे, बाबाजी सोदक, पुरुषोत्तम चोरे, कांताराम चोरे, दत्ता साळवे,विक्रम घोडे, बाळासाहेब खटाटे, बाळासाहेब टेमकर, संजय निकम व कवठे येमाई गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराची सुरुवात मंगळवारी मलठण येथून झाली असून बुधवारी जांबुत येथेही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पंचशील फाऊंडेशन चे डॉक्टर ऋषी कवडे,जाफर शेख, शुभम घोडे,शुभम खटाटे,निखिल देवकर, किशोर कवडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.
सदर शिबिरात मोफत ….
* डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप
* बी पी व शुगर तपासणी
* डोकेदुखी,अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला,त्वचेचे
आजार,पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व
आजारांवर मोफत औषधे वाटप
* डोळ्यांसाठी नंबर लागल्यास एक हजार रुपयांचा चष्मा फक्त १५०ते २०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, खराब हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे ‘एक पाऊल आरोग्याकडे’ म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे पंचायत समीती सदस्या अरुणा घोडे यांनी सांगितले.