Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सातेवाडी येथे विधवा प्रथा बंदीसाठी प्रथमच  हळदी कुंकू समारंभ संपन्न…! 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 September 2022, 18:38

अजित जगताप

 

वडूज :  खटाव तालुक्यातील  भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व सातेवाडी सरपंच सौ वृषाली विक्रम रोमन यांनी आज गौरी गणपती सणानिमित्त सातेवाडी मध्ये  विधवा माता-भगिनी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. यावेळी अनेक महिलांना आठवणीने अश्रू अनावर झाले होते.

विधवा माता भगिनीं एकेकाळी सुवासिनी म्हणून समाज्यात  वावरल्या होत्या.त्यांना पुन्हा   समाजात तशीच समानतेची  वागणूक मिळावी यासाठी आज ग्रामदैवत जानुबाई देवी यांच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला.

यावेळी  ग्रामपंचायत सदस्या सौ सुरेखा बोटे, सौ उषा बोटे, माजी उपसरंच सौ  संगीता बोटे, वंदना बोटे, निलम सुतार, सुमन माने, सोनाली काळे, चंद्रकला पवार, कांताबाई काळे, विद्या राऊत, ताराबाई रोमन, वंदना रोमन, निलोफर पिंजारी,  रंजना माने , लक्ष्मी  डोंबाळे, लता मुळे,  शारदा देशमुख आदी प्रमुख महिला  उपस्थित होत्या. त्यांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून जेष्ठ महिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

यावेळी बोलताना सातेवाडी सरपंच सौ रोमन म्हणाल्या,  सध्या एकविसाव्या शतकात महाराष्ट्रात विधवा प्रथाबंदी साठी चळवळ उभी राहत आहे.  या चळवळीत सातेवाडी ता खटाव ग्रामस्थांनीही सहभाग घेतला. फक्त सातेवाडी गावापूरते सहभाग न घेता लवकरच संपुर्ण खटाव  तालुक्यात ही चळवळ उभी करणार आहे. आज विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली. विशेषतः या विधवा महिलांसाठी हिरव्या बांगड्या भरून  जानुबाई देवीची ओटी या महिलांच्या हस्ते  भरण्यात आली.

यावेळी  सुमन माने या म्हणाल्या, विधवा महिलंना सर्वच कार्यक्रमात सुद्धा समानतेची वागणूक मिळाली पाहिजे तसेच आता दररोज कपाळावर कुंकू दिसले पाहिजे. आज सरपंच सौ रोमन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे खरोखर कौतुक केले पाहिजे, आज त्यांच्या या निर्णयामुळे समाजात इतर महिलाप्रमाणे वागणूक मिळेल, आणि ही बाब  खरोखर खूप चांगली आहे.असे गौरव उदगार काढले.

दरम्यान,  स्वतंत्र दिनी दि १५ ऑगस्ट चे ध्वजारोहण हे बारावी व प्रजासत्ताक दिनी दि २६ जानेवारीला दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय सातेवाडी ग्रामपंचायत वतीने घेण्यात आला असल्याचे सरपंच सौ वृषाली रोमन यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर! 26 एप्रिलला बैठक, तर 1 मे ला आळंदीत जाहीर होणार वारीचं अंतिम वेळापत्रक

Tuesday, 14 April 2026, 18:30

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33
Next Post

भिगवण येथे गौरी सजावटीतून साकारला भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाचा देखावा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.