लहू चव्हाण
पाचगणी : भारत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिनानिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली (ता.महाबळेश्वर) येथे माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांबद्दल आदर, सन्मान, प्रेम विद्यार्थी व नागरीकांमध्ये वाढावे. यासाठी गोडवली ग्रामपंचायतीने देशसेवा करणाऱ्या माजी सुभेदार अंकुश चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले .
दरम्यान, गोडवली गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळेत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गोडवली गावचे सरपंच मंगेश पवार, उपसरपंच विष्णू मालुसरे, ग्रामपंचायत सदस्या नीलम मालुसरे, स्नेहल पवार, संगीता मालुसरे, ग्रामसेवक वैभव काळे, शिक्षक सूर्यकांत शिंदे अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.