Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु “नॉट रिचेबल”

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 12:51

पुणे : महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची हिंगोली येथे दौऱ्यादरम्यान तसेच मंञालयात भेट घेवून निवेदन सादर केले आहे. यावेळी राज्याच्या या दोन्ही सर्वोच्च प्रतिनिधींनी याबाबत माहिती घेणेकरीता कुलगुरुंशी संपर्क केला असता ते “नॉट रिचेबल” असलेचे निदर्शनास आलेले आहे.

मुख्यमंञी यांनी अधिष्ठाता यांना दोनवेळा संपर्क करुन या मागण्यांवर तोडगा काढणेस निर्देशित केले आहे. माञ मंञालयात कुलगुरुंच्या राज्याच्या मुख्यमंञ्यांचा फोन न घेणेची व “नॉट रिचेबल” असणेची जोरदार चर्चा अधिकारी वर्गात दिसून आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी नॉट रिचेबल असलेले कुलगुरु हे किमान मुख्यमंञी यांचेसाठी तरी रिचेबल असतील अशी असलेली अपेक्षा फोल ठरली. यामुळे विद्यापीठात नेमक चाललय काय याची चर्चा चव्हाट्यावर आली आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ आहे. संशोधना प्रमाणेच येथील स्पर्धा परीक्षा उत्तीर्णतेचा टक्कादेखील अव्वल राहिला आहे. विशेषतः शेतकरी व भुमिहीन शेतमजूर यांचे गरीब कुटूंबातील विद्यार्थी अहोराञ मेहनत करुन यश मिळवत असतात. परंतू अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा व सुविधा देवून कल्याणकारी राज्याचा आदर्श वस्तुपाठ ठेवायचा सोडून या विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर काढून देणेकरीता विद्यापीठ प्रशासन अहोराञ परिश्रम घेत असलेले दिसून येत आहे. होतकरु विद्यार्थ्यांना बाहेर काढणेसाठी अक्षरशः पोलीस बळाचा मदतीकरीता दिलेल पञही माध्यमांमध्ये फिरत आहे. यामुळे विद्यापीठात नेमक चाललय काय? याची चर्चा जोर धरत आहे.

 

गेली दोन वर्षे कोरोनामुळे उद्योग क्षेञाबरोबर बाजारपेठ न मिळाल्याने शेती करणारे शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. यातच अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यातील अभ्यासू मुले कृषि पदवीसह स्पर्धापरीक्षेकडे वळतात व घवघवीत यश मिळवतात. अशी परिक्षेची तयारी करताना पदव्युत्तर शिक्षणानंतरही अनेक वर्षे कधीकधी तयारी करावी लागू शकते. परंतू आर्थिक परिस्थिती नसलेने असे विद्यार्थी वस्तिगृहात राहूनच तयारी चालू ठेवतात. यापूर्वी अनुकूल भुमिका घेत गेली ४० वर्षे विद्यापीठ प्रशासनाने यात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. उलट यास प्रेरणाच दिलेली आहे. एव्हाना माजी कृलगुरु श्री सुभाष पुरी यांनी अशा विद्यार्थ्यांकरीता आय ए एस प्रशिक्षण केंद्र विद्यापीठात सुरू करणेसाठी जोरदार प्रयत्न केलेले होते.

तथापि सध्या असलेले कुलगुरु व प्रशासन यात वारंवार हस्तक्षेप करत हि चळवळच मोडून काढणेचा प्रयत्न करीत असलेचे निदर्शनास येते. यात राञंदिवस वस्तिगृहाची तपासणी करणे, अनोंदणीकृत विद्यार्थ्यांना वस्तिगृहाबाहेर काढणेसाठी खाजगी सुरक्षारक्षकांसह पोलीसी बळाचा वापर करणे, वाचनालय वापरणेस मज्जाव करणे असे प्रकार दैनंदिन स्तरावर सुरू आहेत. यास ञस्त विद्यार्थ्यांनी स्वतःची बाजू मांडणेकरीता कुलगुरुंची अनेकदा भेट मागूनही ते “नॉट रिचेबल” आहेत. आपली व्यथा नाईलाजाने विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व मंञी मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांकडे विद्यार्थ्यांनी मांडली आहे. यावेळी सदर मंञी यांनी संपर्क केला असता कुलगुरु त्यांनादेखील “नॉट रिचेबल” असलेचे प्रत्यक्ष उपस्थित असलेले विद्यार्थांनी सांगितले.

याशिवाय कुलगुरू व प्रशासन किमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी यांचेशी तरी चर्चा करुन तोडगा काढेल या आशेने मंञालय गाठलेले विद्यार्थ्यांनी आपली व्यथा राज्याच्या या सर्वौच्च प्रतिनिधींपुढे मांडलेली आहे. माञ त्यांच्यादेखील फोनकरीता कुलगुरु हे “नॉट रिचेबल” असलेची मोठी चर्चा मंञालय स्तरावर सुरु असलेचे निदर्शनास येते. यामुळे सध्या हे ञस्त विद्यार्थी उघड्यावर दिवस काढीत आहेत. कोणी झाडाखाली तर कोणी रस्त्यावर अभ्यास करत आहेत. राहत असलेले ठिकाण हे अतिशय अस्वच्छ असून अशा विद्यार्थ्यांना कोरोना स्वाईन फ्ल्यु, कोरोना आदी झालेस मोठा धोका उद्भवू शकतो. हे जीवाशी खेळणेसारखे आहे. सन्मानाने आयुष्य जगणेची संधी म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्शभुमीवर असे उघड्यावर दिवस काढावे लागत आहेत. यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

आज होवू घातलेली पदयाञा व मूक मोर्चा राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या घेत असलेल्या बैठकीच्या दिलेल्या आश्वासनामुळे दोन दिवसांकरीता स्थगित करण्यात आलेला आहे. याबैठकीतून तोडगा निघेल अशी विद्यार्थ्यांना आशा आहे. याबरोबरच आतापर्यंत नॉट रिचेबल कुलगुरु याबैठकीस तरी रिचेबल म्हणजेच उपस्थित राहतात का? कुलगुरु प्रतिसाद देतात का? हा देखील चर्चेचा विषय ठरत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

UPSCअंतर्गत विविध रिक्त पदांची  भरती सुरू ; शेवटची तारीख 01 सप्टेंबर...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.