Laxman Kevate : अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) लालपरीच्या प्रवासाचे गेल्या 75 वर्षांचे साक्षीदार असलेले पहिले एसटी वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन झाले. (Laxman Kevate, the first ST conductor, passed away)
अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे वाहक
नगर महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे पहिले वाहक असलेल्या लक्ष्मण केवटे (Laxman Kevate) यांनी वयाच्या 97 व्या वर्षी बुधवारी 17 मे ला रात्री अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी अहमदनगरमधील नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माळीवाडा येथील निरफराके गल्लीत ते राहत होते. तेथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
आजारपणात वाहक केवटे यांचा वैद्यकीय खर्च एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे ते वाहक होते. (Laxman Kevate) एसटीची पहिली बस ते आताची ई -बस या प्रवासाचे ते साक्षीदार होते.
1948 साली महाराष्ट्रात गाव खेड्यांना जोडणाऱ्या एसटीची सुरूवात झाली. 1 जून 1948 ला पुणे-नगर मार्गावर राज्यातील पहिली एसटी धावली. त्यावेळी पहिल्या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक म्हणून लक्ष्मण केवटे यांनी काम केले आहे. (Laxman Kevate) अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar Crime : कोतवाली पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार…!