Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगड सहकारी कारखान्यावर शेतकरी आणि सभासदांना गेटवरच रोखलं ; आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 October 2023, 20:27

जीवन सोनवणे
भोर, ता.२१ : राजगड सहकारी कारखान्याला बँकेची लिलावाची नोटीस आल्यानंतर, कारखान्यावर असणारं कर्ज, शेतकऱ्यांची थकीत पैसे, कामगारांचे थकीत पगार या विषयी पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलेल्या शेतकरी आणि सभासदांना गेटवरच रोखलं गेल्याचा धक्कादायक प्रकार आज शनिवारी (ता.२१) उघडकीस आला आहे.

दरम्यान,  शेतकरी आणि सभासदांना पोलीस बळाचा वापर करत रोखल्यानं काही काळ कारखाना गेटवर तणाव निर्माण झाला होता. तर पोलिसांना पुढं करून कारखाना प्रशासन आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा, पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलेल्या शेतकरी आणि सभासदांनी आरोप केला आहे.

कारखाना प्रशासन अश्या प्रकारे अडवणूक करून, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, आणि कामगारांचा अपमान करत असल्याचा आरोप करत गेट जवळ रस्त्यावरचं बसून त्यानी पत्रकार परिषद घेतली. कारखान्याच्या संचालकांनी कर्जाची नैतिक जवाबदारी स्वीकारून, स्वतः पैसे उभारावेत अशी भूमिका घेत, कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आलं. पुढच्या पंधरा दिवसात समाधान कारक उत्तर न मिळ्याल्यास, भोर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणारं असल्याचा इशारा , सभासद आणि शेतकऱ्यांचा कारखाना प्रशासनाला दिला.

यावेळी रस्त्यावर बसून पत्रकार परिषद घेत, भोर, वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना संजीवनी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर राजगड कारखान्याची निर्मिती केली. आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या हाती कारखाना चालवण्यासाठी दिला. अगदी निर्मितीपासून ते आज पर्यंत हा कारखाना एक हाथी केंद्रित असून देखील, कारखान्यावर आज कोट्यावधी रुपयांचे कर्ज झाले आहे.आणि कारखाना दिवाळखोरीत काढून बंद करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांकडून होत आहे असा आरोप उपास्थित शेतकरी आणि सभासदांकडून करण्यात आला आहे. आमच्या पैशाला जवाबदार कोण याचं उत्तर ना कारखान्याचे अध्यक्ष देत आहेत ना एमडी, असं म्हणतं उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

 

शेतकरी आणि सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न पुढीलप्रमाणे
गेली 30 वर्षे सातत्याने गाळप करून देखील कारखाना तोट्यात कसा?30 वर्षात कारखान्याची मशनरी अद्यावत का करण्यात आली नाही? कारखाना अचानक बंद पडल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस कसा गाळप केला जाणारं? शेतकऱ्यांची थकीत एफआरपी (10 कोटी )कोण देणारं? कामगारांचे थकीत पगार कोण देणार?कर्जाचा संपूर्ण बोजा आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक संचालकांच्या खाजगी मालमत्तेवर चढवण्यात यावा. कामगारांच्या भविष्याची तरतूद काय? कोट्यावधी रुपयांचे कर्ज कसे फेडणार? कामगारांना देण्यात येणाऱ्या ग्र्याच्युटी काय?कारखान्यावर एवढे कर्ज असताना, देणी देयची असताना गरज नसणारा इथेनॉल प्रकल्प का उभारण्यात आला?संचालकांनी या कर्जाची नैतिक जवाबदारी स्वीकारून स्वतः पैसे उभारावेत.कर्ज फेडण्यासाठी कारखान्याच्या मालकीची जागा विक्री करू नका असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25

जगतापांचं बंड जिव्हारी लागलं, जय पवार भावुक; म्हणाले ‘आम्हाला वाटलं नव्हतं की दादा नसतांना अशा प्रकारे…”

Monday, 5 October 2026, 16:17

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थित न राहण्याचं शिवसेना शिंदे गटाचं फर्मान! रोहिणी खडसेंच्या दाव्याने खळबळ

Monday, 5 October 2026, 16:14
Next Post

Breaking News : बारामतीत रेड बर्ड कंपनीचे विमान पुन्हा कोसळले ; वैमानिक जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp