पुणे : साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या मुसक्या साताऱ्या पोलिसांनीं आवळ्ल्या आहेत. यानंतर केलेल्या चौकशीत ते सुपारी घेऊन येथे धीरज ढाणेच्या खुनाच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात साताऱ्यातील माजी नगराध्यक्ष वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लिवे हा सूत्रधार आहे. खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी सातारा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष यांच्या मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळीच कलांटणी मिळाल्यामुळे या गुन्ह्यातील अटक केल्यांची संख्या सात वर गेली आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी नगराध्यक्ष मुक्ता लेवे यांचे पती वसंत लेवे यांना मारहाण झाल्याचा राग मनात धरून धीरज ढेणे यांचा गेम करायचा होता. यासाठी माजी नगराध्यक्ष यांचा मुलगा निलेश लेवे यांनेच संशयीताना 20 लाखाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहरच्या गुन्हे प्रकटी करणच्या पथकाने पाच जणांच्या सशस्त्र टोळीला अटक केल्यानंतर माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच खुनाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पोलिसांनी पोलिसांनी अनुज चिंतामणी पाटील,दीप भास्कर मालुसरे, आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी, अक्षय अशोक कुंडूगळे,क्षितिज विजय खंडाईत या पाचजणांना अटक केली आहे. या प्रकारणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता खोटी माहिती संशयित आरोपींनी दिली. मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकरणातील संशयितांकडे देशी बनावटीची दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतूस, चार रिकाम्या पुंगळ्या, दोन लोखंडी सुरे व महागडे मोबाइल, दोन दुचाकी सापडल्या आहेत.