उरुळी कांचन, (पुणे) : शाळेचे शिक्षण झाल्यानंतर २९ वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतक्या वर्षांत प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला असतो. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे, मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एवढ्या वर्षांनीही जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात, हे साध्य केले आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या १९९२-९३ सालातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे सोमवारी (ता. १७) २९ वर्षांनंतर एकत्र येऊन एकदिवसीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या सर्वांचे स्नेहसंमेलन सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात झाले. त्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या जुन्या आठवणींनी उजाळा दिला. यावेळी निवृत्त शिक्षकांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांची भाषणे त्यानंतर चोरगे लॉन्स सोरतापवाडी या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थी शिक्षक यांनी आपला परिचय करून दिला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले तर २९ वर्षांनंतर सर्वजण पहिल्यांदाच भेटत असल्याने एकमेकांची आस्थेने चौकशी केली. त्यामध्ये माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली शिक्षकांची भाषणे झाली सदर कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्याचे प्रसिद्ध असे निवेदक नंदू भाऊ जगताप यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता.
या स्नेहमेळाव्यासाठी संतोष चौधरी, अशोक चौधरी, सविता हरगुडे, शिल्पा गुंजाळ,राणी ताई कोतवाल, नवनाथ चौधरी, आण्णा चौधरी, विकास शिंदे, दिपक आबनावे,छाया शेंडकर, सौ किरण आंबवले, राजेंद्र गुंड, अलका भांडवलकर, अलका कटके यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला ६५ विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद साधून आठवणींना उजाळा दिला.
आपापल्या वर्गात जाऊन वर्गशिक्षकांबरोबर संवाद साधला. सदर स्नेह मेळाव्यात पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पडवळ सर, माजी मुख्याध्यापिका उपाध्ये मॅडम, केसरी मॅडम देशपांडे मॅडम, चौधरी मॅडम, निवृत्त शिक्षक कुलकर्णी सर उपस्थित होत्या. या कार्यक्रमा नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
दरम्यान, सदर कार्यक्रमाचे नियोजन सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून एकत्र येऊन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी बापूसाहेब लाड यांनी केले प्रस्तावना विकास आप्पा चौधरी यांनी केले तर आभार सुभाष कड यांनी मानले.