लहू चव्हाण
पाचगणी : कायदा व सुव्यवस्थेला बाधा येवू न देता सर्वांनी गणेशोत्सव साजरा करावा. कोरोनानंतर प्रथमच गणेशोत्सव साजरा केला जात असताना मंडळानी डॉल्बीला परवानगी नसल्याने डॉल्बीचा वापर टाळावा. कोणत्याही धर्माच्या भावना दुःखवणार नाही. यांची काळजी घेत सर्वांनी गणेश उत्सव आनंदात साजरा करा.असे आवाहन पाचगणीचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी केले.
पाचगणी येथील पालिकेच्या टाऊन हॉल येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर, अरविंद माने, महावितरणचे अधिकारी सचिन बाचल आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले कि, मागील दोन वर्ष कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांना गणेश उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी तरुणाईमध्ये उत्साह आहे. हा उत्साह त्यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाव आदी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा. जेणेकरुन समाजात आणि इतर गावात देखील आगळावेगळा संदेश जाईल.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर म्हणाले कि, गणेश उत्सव साजरा करताना अति उत्साहात काही चुकीचे होऊ नये, याची दक्षता घ्यावी. पालिकेच्या माध्यमातून टेबल लॅंन्ड तलावात विसर्जनासाठी तराफा तयार केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे
दरम्यान, या बैठकीला पाचगणीतील मंडळाच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर या कार्याक्रमाचे आभार यशवंत महामुलकर यांनी मानले.