अजित सायगावकर
सायगाव : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातारकरांच्या हट्टामुळे जावळीकरांची संधी हुकली आहे. तरी आम्ही रुसलो नाही. उलट, आम्ही खंबीरपणे पाठिंबा दिला आहे. असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे नेते व माजी संचालक शंकर जांभळे यांनी करंजे तर्फ सातारा येथे केले.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त सभासद विकास पॅनलच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्यात श्री जांभळे बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक महासंघ जुनी पेन्शन हक्क संघटना प्रहार संघटना खाजगी प्राथमिक शाळा महासंघ आश्रम शाळा संघटना आणि शिक्षक भरती भारती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी तसेच पॅनल प्रमुख श्री सिद्धेश्वर पुस्तके, चेअरमन राजेंद्र घोरपडे, ज्ञानेश्वर कांबळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सोनवलकर, ल. गो. जाधव, अजित साळुंखे, सुरेश गायकवाड तसेच मान्यवर शिक्षकांची उपस्थित होती.
जावळीने कधीही विश्वासघात केला नाही.करीत नाही. विकासाच्या नावाने बँकेमध्ये पाठिंबा देत आहे. शिक्षकांसाठी झटणाऱ्या सिद्धेश्वर पुस्तके यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टार्गेट केले जात आहे.
पुस्तके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी जावळीकर कधी कमी पडणार नाही. असे ही जांभळे यांनी स्पष्ट केले.फलटण-वाई- कराड- पाटण या ठिकाणी मेळाव्याला पाठिंबा मिळालेला आहे.
त्यामुळे शिक्षक सभासद हे विकास पॅनलच्या पाठीशी आले आहेत. सोळा वेळा व्याजदर कमी करून हे टीका होत आहे. बँकेच्या कामकाजावर त्यांनी बोलण्याऐवजी पुस्तके सारख्या प्रामाणिकपणे झटणाऱ्या नेत्यांवर सर्वजण तोंडसुख घेत आहेत.
तरीही संघाचा बालेकिल्ला अबाधित राहील असा विश्वास सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केला.यावेळी अजित साळुंखे, ल. गो. यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. या मेळाव्याला नितीन राजे, विलास शिंदे, संतोष कोरडे, प्रदीप मस्के, रुपेश शिंदे, नूतन जाधव, जायकर, रेखा मोहिते, मनीषा रसाळ आधी शिक्षक सभासद उपस्थित होते.
सात वर्षात स्वच्छ व पारदर्शक कारभार केल्यामुळे विरोधकांना कोणताही मुद्दा शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर माझ्यावर टीका करण्यात धन्यता मनात आहेत, अशी टीका पुस्तके यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंगळवार दि १५ नोव्हेंबर रोजी खाजगी शाळा व नगरपालिकेचा मेळावा होणार आहे अशी माहिती ज्ञानेश्वर कांबळे यांनी दिली.
मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल प्रकाशक चंद्रकांत बडदरे, निलेश पोरे, सुनील बुधावले, हेमंत इतापे, अतुल कुलकर्णी व नलिनी वाडते यांनी शिक्षक सभासदांचे आभार मानले.