उरुळी कांचन, (पुणे) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. तसेच जयंतीनिमित्त सोमवारी (ता. ३१) उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व तलाठी कार्यालय उरुळी कांचन यांच्या सहभागातून एकता दौडचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, पर्यवेक्षक भागवत जाधव, तांत्रिक अधीक्षक पाटील सर, पर्यवेक्षिका हरिभक्त मॅडम, उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद, तलाठी सुधीर जायभाय, प्रदीप जवळकर, निवृत्ती गवारे, कोतवाल रामलिंग भोसले, योगेश पवार, व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या शालेय मैदानातून एकात्मता दौडला सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी होऊन उरुळी कांचन बाजारपेठ व आश्रम रोडवरून एकात्मतेचा संदेश देण्यात येत होते. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करून शाळेच्या प्रांगणात दौडची सांगता करण्यात आली.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याला उजाळा देत अखंड भारतासाठी पटेल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली.