पुणे : चार वाहतूक प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना मंगळवार ( ता.१ ) नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकार करण्यात आला आहे. तसेच ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नसणाऱ्या वाहनांना सीटबेल्ट बसवण्यासाठी देण्यात आलेली १५ दिवसाची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे उद्या पासून सहप्रवासी विनासीट बेल्ट आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक करावी केली जाणार आहे. अशी माहिती असे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेली मुदत आज म्हणजेच 31 ऑक्टोबरला संपत आहे, त्यामुळे मंगळवार म्हणजेच उद्यापासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल तर इ चलान कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक असे देखील पोलिसांनी म्हटले आहे. ओला, उबर यांसारख्या अॅपवरील टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी काळी-पिवळी टॅक्सीमध्ये हे बेल्ट बसविण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ही सक्ती आम्हाला नसल्याचे टॅक्सीचालक म्हणत असले तरी कारवाई सरसकट सगळ्यांवर केली जाणार आहे. असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात वाहतुकीशी संबंधित वेगवेगळे नियम आहेत. हे नियम मोडल्यास नागरिकांना दंडही भरावा लागतो. पण तरीही पुणेकर या नियमांच्या बाबतीत उदासीन आहेत. दुचाकीवर हेल्मेट वापरावे, गाडी चालवताना लायसन्स आपल्याबरोबर बाळगावे, फोनवर बोलू नये, सीट बेल्ट लावावे, हे काही साधारण नियम आहेत.