सुरेश घाडगे
परंडा : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ( पिंपळनेर ता . माढा ) वतीने परंडा तालुक्यातील ५४६ सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी यांना येथील कार्यालयात शुक्रवार (दि.९) सवलतीच्या दरात प्रति ५० किलो साखर वाटप करण्यात आली. यावेळी गटप्रमुख अभिषेक घाडगे, कारखाना प्रतिनिधी एकनाथ मोरे, नानासाहेब शिंदे, ऊस उत्पादक – सभासद दादा खरात, नितिन तांबे, तानाजी घोडके, धनाजी वाघमोडे, श्रीकृष्ण ढोरे आदि उपस्थित होते. या कारखान्याने २०२१-२२ गाळप हंगामात २४ लाख ८० हजार मेट्रिक टन उस गाळप केलेले आहे.
या हंगामातील गाळप केलेल्या उसाला प्रति मे .टन २६०४ रुपये दर संस्थापक चेअरमन आ. बबनदादा शिंदे यांनी जाहिर केलेला आहे. हा उच्चांकी दर ठरत असून पहिली उचल २१००, दुसरा हप्ता २५० असे २३५० सभासदांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तर २५४ चा तीसरा हप्ता दसरा – दिवाळीच्या अनुषंगाने दोन दिवसात सभासदांच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वाधिक दर व साखरेचा गोडवा दसरा-दिवाळी सणाच्या पुर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कारखान्याकडून मिळालेले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.