गणेश सुळ
केडगाव : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर येथे दुसरा श्रावणी सोमवार रोजी दिवसभरात हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील तरुण भाविकांनी मध्यरात्री बारानंतर मंदिरात येऊन दर्शन घेण्यास सुरुवात केली.
नेहमीप्रमाणे पहाटे शिवलिंगास दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने महाआरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडापाशी भुलेश्वरास मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंघोळ घालण्यात आली.
महाआरती करून पालखी व कावड मिरवणूक काढण्यात आली. दुपारी दोन वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारावर मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. त्यानंतर पालखीची महाआरती करण्यात आली.
यावेळी भाविक भक्तांना सालाबादप्रमाणे 500 किलो खिचडी वाटपाचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. सकाळी साडेअकरापासून ते सायंकाळी सहावाजेपर्यंत जवळपास 5500 भाविक भक्तांनी खिचडीचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजक दौंड तालुका उपाध्यक्ष संजय थोरात, सीमा दिवेकर महिला अध्यक्ष दौंड तालुका, बाळासाहेब खेनट, कार्याध्यक्ष अतुल आखाडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष दीपक गाढवे, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष उमेश दिवेकर, साईनाथ उद्योग समूहाचे मालक लक्ष्मण खेनट, खुटबावचे माजी सरपंच शिवाजी थोरात, सदस्य किरण थोरात, चेतन ढवळे, पप्पू मोटे ,श्याम कदम,संकेत थोरात, संदीप जगदाळे, राहुल मिटकरी, राणीताई थोरात, हेमा खेनट, बाळासाहेब तावरे देणगीदाराचे सहकार्य लाभले.