Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकसभेच्या सर्व जागा ताकदीने लढवणार : माजी मंत्री महादेव जानकर

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 August 2023, 20:30

संदीप टूले
केडगाव, ता.२९: माझा राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र असून, मी कोणत्याही पक्षाची मदत न घेता, युती न करता लोकसभेसह महाराष्ट्रातील सर्व विधानसभेच्या जागा पूर्ण ताकदीने लढवणार आणि ती जिंकून आणणार असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी दौंडमध्ये व्यक्त केला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाची जनस्वराज यात्रेला पंढरपूरवरुन सुरुवात करण्यात आली. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे या यात्रेत सहभागी आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी सुरू झालेली ही जनस्वराज यात्रा बारामती लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि .२८) पोहोचली. त्यानंतर दौंड तालुक्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या जनस्वराज यात्रेचे स्वागत केले.

दौंड येथे पत्रकारांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, सध्या जनतेचे राज्य नसून जनतेचे राज्य आणण्यासाठी ही स्वराज्य यात्रा सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिलांच्या समस्या काय आहे हे जाणून घेत आहे. सध्या दुष्काळाची अवस्था निर्माण झाली आहे. ती सोडवण्यासाठी आणि रयतेचे राज्य यावं यासाठी ही यात्रा काढली आहे.

 

देशातील आगामी लोकसभेच्या ५४३ जागा लढवणार आहे. त्यात बारामती, माढा, परभणी यासह लोकसभा मतदारसंघाची तयारी चालू आहे. बारामती लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे पण पक्षाने मला या जागेवर उमेवारी दिली, तर उभा राहील, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

दौंडचे स्थान माझ्या हृदयाप्रमाणे; जनतेने मला मोठी मदत केली

अगोदर लोकसभेचे रणांगण करणार असून, लोकसभेला दिल्लीला जाणार आणि विधानसभा लढविणार. दौंडचे स्थान हे माझ्या हृदयाप्रमाणे येथील जनतेने मला मोठी मदत केली आहे. त्यामुळे दौंडच्या तमाम जनतेचा मी ऋणी आहे. दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार उभा करणार आणि जिंकणारही, असा विश्वास महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी या जनस्वराज्य यात्रेमध्ये दौंड तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

भुलेश्वर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने खिचडी वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.