अजित जगताप
वडूज : आईसाहेब प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने वडूज ता. खटाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. यावेळी अनेक माता- भगिनींनी आईसाहेब प्रतिष्ठानचे आभार मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याबाबत माहिती अशी की, कालगावचे सरपंच व प्रतिष्ठानचे संस्थापक- अध्यक्ष सोमनाथ चव्हाण यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते सचिन खुडे,विशाल गोडसे यांनी वडूज नगरीतील सुप्रसिद्ध दंत विशारद डॉ. महेश माने यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता भिकुराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक माता-भगिनींना फळ व अल्पोपहार वाटप करून या सुपुत्राने खऱ्या अर्थाने सामाजिक जाणीव ठेवली.
वडूज नगरीतील सामाजिक कार्यकर्ते सचिन खुडे व मनसेचे युवा जिल्हाध्यक्ष सुरज लोहार, विशाल गोडसे, अजय दुबळे,राजवीर लोहार, गणेश फाळके, उस्मान सय्यद, मन्सूर खोत, सुर्या सस्ते, नवनाथ दणाणे, ओंकार वायदंडे, सुरज माळी,स्वप्निल शिंदे तसेच नाथसाहेब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. महेश माने या मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
आईच्या वाढदिवसानिमित्त गरीब ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यामध्ये सामाजिक जाणीव होती. आईने अहोरात्र कष्ट करून आपल्याला सांभाळलेला आहे. तसेच इतर माता भगिनींनी आपला संसार चालवताना काबाड कष्ट केले आहेत.
त्याची जाणीव ठेवूनच काही आजारी रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्याबद्दल रुग्णांनी श्रीमती हेमलता माने यांना शुभेच्छा देऊन आभार मानले. वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो आणि आनंदाच्या क्षणी अनेक साक्षीदार व्हावे या संकल्पनेतून केलेल्या कामाचं अनेकांनी कौतुक केले आहे