दिनेश सोनवणे
दौंड : खडकी (ता दौंड) येथील श्रीदत्त विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने यंदा सभासदांना दिवाळी लाभांश १२ टक्क्याने वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे अध्यक्ष गणपत काळभोर व सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिर काळभोर वस्ती या ठिकाणी संपन्न झाली. या सभेत चालू आर्थिक वर्षातील २०२०-२०२१ मधील निव्वळ नफा १७ लाख रुपये झाल्याचे संस्थेचे सचिव राजेंद्र आटोळे यांनी सर्व सभासदांना आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
दरम्यान, या नफ्यावर संस्थेने १२% लाभांश वाटपाचा निर्णय अध्यक्ष आणि संचालक मंडळाने घेऊन आज सर्व सभासदांना लाभांश वाटण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन काळभोर व सर्व सभासद उपस्थित होते.