Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले ‘मी कधीही…’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 September 2026, 18:37

पुणे : दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एका नव्या वळणासह मोठा राजकीय रंग चढला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून स्वतंत्र तपास सुरू केला असून, त्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणावर आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाचं प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले आहे की,”मी माझ्या हयातीत दिशा सालियान यांना कधीही भेटलेलो नाही आणि माझी त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक ओळख नव्हती,” राजकीय द्वेष आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशानेच गेली काही वर्षे सातत्याने या दुर्दैवी घटनेशी कसलाही ठोस पुरावा नसताना आपले नाव जोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ अफवांवर आधारलेली माध्यमांमधील चर्चा आणि राजकीय बोंबाबोंब सत्य बदलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना तें म्हणाले, तपास यंत्रणांनी कोणत्याही राजकीय दबावाला किंवा हस्तक्षेपाला बळी न पडता निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे ही चौकशी पूर्ण करावी. खोट्या प्रचाराच्या किंवा चारित्र्यहननाच्या प्रयत्नांना न घाबरता अन्यायाविरोधातील हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दिशा यांच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे लैंगिक अत्याचार आणि हत्येसारखे गंभीर आरोप लावत हा तपास सुरू करण्यात आला आहे. जबाबात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आल्याचे दावे राजकीय वर्तुळात केले जात आहेत

 

.दुसरीकडे, शिंदे गटासह इतर विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सीबीआयच्या या नव्या तपासातून नक्की काय निष्पन्न होते आणि प्रकरणातील सत्य कसे समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण नवीन वळणावर! सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Thursday, 17 September 2026, 22:56

पुण्याच्या इनर रिंग रोडसाठी तब्बल १०८८ कोटींचा खर्च! भूसंपादनाच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता

Thursday, 17 September 2026, 22:16

१३५ कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी टाकला छापा

Thursday, 17 September 2026, 21:42

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Thursday, 17 September 2026, 21:07

हडपसर, कोंढवा, खराडीसह ६ ठिकाणी नव्या सदनिका; घर खरेदीदारांसाठी मोठी खूशखबर

Thursday, 17 September 2026, 20:58

मराठवाडा थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडला! बीड ते पुणे रेल्वे सेवा सुरू; अवघ्या ७ तासांत होणार प्रवास

Thursday, 17 September 2026, 20:11
Next Post

"5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे तातडीने पंचनामे सुरू होणार" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे करणार दुष्काळी भागांची पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp